23.2 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राजकीय नवनिर्वाचित बॅक संचालकांचा खरेदी विक्री तर्फे सत्कार

नवनिर्वाचित बॅक संचालकांचा खरेदी विक्री तर्फे सत्कार

0
53

अर्जुनी-मोर.-दि.मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया जिल्हाची नुकतीच निवडणुक संपन्न झाली.यामधे अर्जुनी-मोर. तालुक्यातुन तिन संचालक निवडुन आले.त्यामुळे तिन्ही संचालकांचा दि.तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती अर्जुनी-मोर. च्या वतीने केवळराम पुस्तोळे,सौ.रचनाताई गहाणे,विजयसिंह राठोड यांचा शाल श्रीफळ देऊन ता.30 सत्कार करण्यात आला.
खरेदी विक्री समितीच्या सभागृहात आयोजीत सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष तथा खरेदी विक्री समितीचे उपाध्यक्ष विजय कापगते होते.विशेष अतिथी व सत्कार मुर्ती म्हणुन खविसचे अध्यक्ष तथा बँकेचे संचालक केवळराम पुस्तोळे,जि.प.सदस्य तथा बँकेचे संचालक रचनाताई चामेश्वर गहाणे,लक्ष्मी भात गिरणीचे संचालक तथा बँकेचे संचालक विजयसिंह राठोड, खरेदी विक्रीचे संचालक चामेश्वर गहाणे,तानाजी ताराम,यशवंत परशुरामकर, रत्नाकर बोरकर,लैलेश शिवणकर,पंढरी लोगडे,जयंत लांजेवार,टिकाराम नाकाडे,मधुकर गहाणे,विलास बन्सोड, सुरेश कापगते,भाष्कर मेश्राम, पदमाताई विजयसिंह राठोड, संध्या नाकाडे,व्यवस्थापक केशव गहाणे,सुरेश गंथडे व अन्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

blank