27.9 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय आप चे गोंदिया नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश दमाहे

आप चे गोंदिया नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश दमाहे

0
263

गोंदिया,दि.२९ः येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या असून गोंदिया जिल्ह्यातही या निवडणुकीने जोर पकडला आहे.सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी विविध माध्यमातून आपल्या प्रचाराला सुरवात केली असतानाच आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शैलेष बैस यांनी गोंदिया नगर परिषदेकरीता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उमेश मनोहर दमाहे यांच्या नावाची घोषणा केली आहे.सोबतच गोरेगाव,तिरोडा ,सालेकसा येथील नगरपंंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकीत सुध्दा आप पुर्ण ताकदिने लढणार असल्याची घोषणा बैस यांनी केली आहे.नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून उमेश दमाहे यांच्या नावाची घोषणा होताच दमाहे यांनी आपण पक्षाचा आदेश स्विकारत निवडणुकीच्या रिंगणता युवा चेहरा म्हणून उतरणार असल्याचे सांगितले.