27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय शहराचा सर्वांगीण विकास खा.प्रफुल पटेल यांच्या सक्षम नेतृत्वात नागरिकांना दृढ विश्वास– माजी...

शहराचा सर्वांगीण विकास खा.प्रफुल पटेल यांच्या सक्षम नेतृत्वात नागरिकांना दृढ विश्वास– माजी आमदार राजेंद्र जैन

0
59

गोंदिया,दि.३०ः नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष सौ. राजलक्ष्मी तुरकर, युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीसाठीची रणनिती, उमेदवार निवडीची प्रक्रिया तसेच पक्ष संघटन व बूथ अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला मार्गदर्शन करताना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि विकासाभिमुख धोरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या सक्षम नेतृत्वात गोंदिया शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि पक्षाच्या विकासनितीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे त्यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील रितु मंडल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

बैठकीला यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, प्रेमकुमार राहंगडाले, राजलष्मी तुरकर, हुकुमचंद अग्रवाल, नानू मुदलियार, माधुरी नासरे, अशोक सहारे, मनोहर वालदे, केतन तुरकर, टी एम पटले, कुन्दा दोनोडे, निर्मला मिश्रा, शर्मिला पाल, मालती कापसे, रुचिता चौहान, संगीता माटे, मोनिका सोनवाने, वर्षा बैस, वर्षा नागदेवे, आरिफा खान, अफसाना शेख, फिरोजा खान, नूरजहां शेख, चाहत शेख, फिरोजा खान, ममता कुमार, किरण कावड़े, राजू एन जैन, साजन वाधवानी, गुलाम यासीन, मनोज जोशी, मृतुन्जय सिंग, विनोद पंधरे, हरगोविंद चौरसिया, आनंद ठाकुर, लखन बहेलिया, सौरभ जैस्वाल, प्रेम जैसवाल, हरबक्ष गुरनानी, ढेकवार गुरुजी, रमेश कुरील, मिलिंद नागदेवे, खालिद खान, बिट्टू जैस्वाल, राजेश तुरकर, झलकसिंग बिसेन, शंकर सहारे, खम्बू अग्रवाल, सचिन अवस्थी, विनोद शेंडे, श्रवण ठकरानी, राज शुक्ला, सुजीत ठाकुर, नासिर शेख, राजा जैस्वाल, अनुज जैस्वाल, दिलप्रीत होरा, संजू शर्मा, रमाकांत मेश्राम, जयेश जामभुलकर, दिलीप व्यास, वामन गेडाम, मनोज उपाध्याय, नागों बंसोड, रवि आसवानी, अमोल ककवानी, अविनाश महावत, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े, सुनील पटले, शैलेन्द्र वासनिक, हरवर्धन मेश्राम, प्रफुल नासरे, बंटी डोंगरे, सुरेश पटले, पंकज मिश्रा, भरत बहेलिया, विक्रम बहेलिया, ओमेंद्र गजभिए, शारूख पठान, आर डी अग्रवाल, शरभ मिश्रा, रौनक ठाकुर, जाकिर खान, अजाब राहंगडाले, जितेंद्र कड़वे, मंगेश रंगारी, राहुल ठाकुर, तुषार उके, अश्विन वंजारी, एकनाथ वहिले, आकाश वादवे, मोंटू सुखदेवे, हनवते गुरुजी, शैलेश टेंभरे, श्याम चौरे, राहुल वंजारी, संदीप पटले, निशांत दिप, आशिष ठाकरे, जितेंद्र भंडारकर, अरुण गजभिए सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.