23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राजकीय अर्जुनी-मोरगावात उबाठाची संघटनात्मक पुनर्बाधणी

अर्जुनी-मोरगावात उबाठाची संघटनात्मक पुनर्बाधणी

0
161

अर्जुनी-मोरगाव- तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर निर्माण झालेली संघटनात्मक पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने तातडीने पावले उचलली आहेत. नवेगावबांध येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. या नियुत्क्त्यांमधून संघटना व्यक्तीपेक्षा मोठी असल्याचा संदेश देत पक्षाने तालुक्यातील संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या नियुत्क्त्यांनुसार मोरेश्वर सौंदरकर यांची तालुका प्रमुखपदी, नरेश बोरकर यांची तालुका संघटकपदी तर अर्चना देशमुख यांची महिला तालुका संघटिकापदी नियुक्ती करण्यात आली. रिक्त झालेल्या पदांवर तातडीने जबाबदाऱ्या सोपवून पक्षाने संघटन विस्ताराला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. गोंदिया जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांनी या संपूर्ण प्रक्रियेत प्रभावी नेतृत्व दाखवत रिक्त पदांवर तत्काळ नियुत्क्त्या करण्यास प्राधान्य दिले. काही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर संघटनेत निर्माण झालेली अनिश्चितता दूर करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. संघटनेची घडी विस्कटू न देता नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्या संघटन कौशल्याची तालुक्यात चर्चा होत आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांनी शिवसेना (उबाठा) ही संघटना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यरत राहील. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील संघटना सक्षम असून आगामी काळात नवीन शाखा स्थापन करून पक्ष विस्ताराला अधिक गती दिली जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल,उपजिल्हाप्रमुख राजू पटले, सडक-अर्जुनी तालुका प्रमुख मनोज रामटेके, जिल्हा संघटिका अॅड. हेमलता चव्हाण यांच्यासह ज्ञानदेव कापगते, प्रकाश उईके (शहर प्रमुख), बबन बडवाईक, यादवकुंभरे (माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), नानाजी झोडे, रेवचंद फुंडे, कृष्णा चांदेवार, मुकेश चाफेकर, घनश्याम कापगते, संतोष राखडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

blank