25.8 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home विदर्भ साकोली येथे ओबीसी जनगणनेसाठी तहसीलदारांमार्फत निवेदन सादर

साकोली येथे ओबीसी जनगणनेसाठी तहसीलदारांमार्फत निवेदन सादर

0
9
साकोली: “ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे,” या प्रमुख मागणीसाठी आज साकोली येथे विविध ओबीसी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने साकोलीचे तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार खाटिक आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या (NCBC) अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती यांना निवेदन पाठवण्यात आले.
ओबीसी समाजाला त्यांचे हक्क आणि लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना अत्यंत आवश्यक असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीसाठी साकोली तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते.या निवेदन सादरीकरण प्रसंगी साकोली तालुक्याचे मुख्य समन्वयक केशव अतकरी, साकोली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. देवश्री कापगते, ॲड. मनिष कापगते, डॉ. अशोक कापगते,एकनाथ सारवे, राध्यशाम खोब्रागडे, विनोद तीडके, चंद्रशेखर कापगते, भाऊराव फुलबांधे, बुधराम भुरे, श्री. रूनाल मोरांडे, सुर्यभान चेटुले, नगरसेवक श्री. धीरज सुरसाऊत, खेमु मोटघरे, सुखराम गभने, मनोहर तलमले, किशोर तरजुले, जयकृष्ण खराबे, रविकुमार मस्के, अर्णव हटवार, दिवाकर कापगते, सुरेश ठाकरे, शिवप्रसाद लांजेवार, चंद्रकांत सारंगपूरे, नंदलाल लंजे, आणि लेकचंद राउत,सौ. सीमा कापगते, अनिता कापगते, सौ. भारती हातगाडे, ज्योती चांदेवार, सौ. सिंधु खोब्रागडे, कल्पना अतकरी, सुभद्रा सारवे, शशिकला चेटुले, भारती लंजे, आणि नगरसेविका प्रितीताई डोंगरावर प्रामुख्याने उपस्थित होते.ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष देऊन आगामी जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करावा, अशी आग्रही मागणी या वेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी केली आहे.