नागपूर: विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची वर्णी लागली आहे. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेतील सर्वात तरूण विरोधी पक्षनेते ठरले आहेत.
यापूर्वीच राष्ट्रवादीनं विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडेंचं नाव पुढे केलं होतं. त्याची औपचारीक घोषणा करण्यात आली.सध्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे 28 आमदार आहेत. त्यामुळं त्यांची निवड करण्यात आली आहे.
एकीकडे राष्ट्रवादीनं विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळवलंय. पण विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही संख्याबळाच्या जोरावर ह्या पदावर दावा केला आहे. मात्र यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.