भाजपाचा शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव

0
10

मुंबई, दि. 13 – महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होऊन आज तिसरा दिवस आहे, तरी शिवसेना-भाजपाच्या युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. युतीसाठी दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सकारत्मक प्रतिसाद मिळत असला तरी जागावाटपाच्या निर्णयानंतरचं युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मातोश्रीवर आज शिवसेनेची बैठक पार पडली पण त्या बैठकीत काय झाल, याबाबतची माहिती गुलदस्त्यातच आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी भाजपाकडून युतीचा प्रस्ताव आल्याचे सांगितले आहे.