वन्यजिवाच्या छायाचित्रासोबतच वनसंवर्धनही महत्वाचे-नयन खानोलकर

0
17

गोंदिया फेस्टीवल निमित्त फोटोग्राफी कार्यशाळा उत्साहात

गोंदिया berartimes.com,दि.13 :छायाचित्रकारांनी छायाचित्र टिपण्याआधी संबधित विषयाचा अभ्यास केला पाहिजे.अभ्यास करतानाच ज्या काही वन्यजिव प्राण्यांचे आपण छायाचित्र काढणार आहो ते फक्त छायाचित्र म्हणून राहायला नको तर ते टिपतांना त्यासोबतच वन्यसवंर्धनही कसे करता येईल हे सुध्दा छायाचित्रकारांसाठी महत्वाचे असल्याचे विचार प्रसिध्द अंतरराष्ट्रिय वन्यजीव छायाचित्रकार व बीबीसी वाईल्डलाईप आॅस्कर पुरस्कारविजेते नयन खानोलकर यांनी व्यक्त केले. ते गोंदिया येथील गेट वे हाेटल येथे अनेक छायाचित्रकारांमध्ये निसर्ग व वन्यजीवांचे छायाचित्र काढण्याची आवड निर्माण व्हावी. तसेच अनेक हौसी छायाचित्रकार जिल्ह्यातून तयार व्हावेत यासाठी गोंदिया फेस्टीवलच्या निमित्ताने आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना आज १३ जानेवारी रोजी बोलत होते.
कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर,सहाय्यक वनसरंक्षक वन्यजीव कातोरे,सेवानिवृत्त एसीएफ,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे,उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,जिल्हा नियोजन अधिकारी तिडके,तहसिलदार अरविंद हिंगे,के.टी.मेश्राम आदी अधिकारी उपस्थित होते.
श्री.खानोलकर हे प्रसिध्द आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार असून आंतरराष्ट्रीय निकॉन या प्रसिध्द फोटोग्राफी कॅमेराचे ते ब्रँड ॲम्बेसीडर आहे. सन २०१६ चा बीबीसी वाईल्डलाईफ ऑस्कर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. श्री.खानोलकर यांनी उपस्थित छायाचित्रकारांना फोटोग्राफीचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देत छायाचिंत्राकंन करताना आपल्यासमोर स्टोरी असायला हवे.तसेच वन्यप्राणी आणि मनुष्य यांंच्यातील प्रत्येक गोष्टीची माहिती आपणास हवी.आजकल सफारी छायाचित्रकारीता खूप होत असून त्यातून नेमके जे यायला हवे ते येत नाही.त्यासाठी आपण कलात्मकतेसोबतच वनसंवर्धनालाही महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी काळे यांनी गोंदिया जिल्ह्यात सारस फेस्टीवल सोबतच सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात येत असून किटकनाशकामूळे वन्यजीव व प्राण्यांचे होणारे नुकसान पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील 25 गावांची निवड करुन त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सोबतच गावखेड्यातील 12-15 तलावांच्या शेजारी वाचटाॅवर उभारून होम स्टे ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उपवनसंरक्षक रामगावकर यांनी वनकायद्यामुळे जंगलाचे व वन्यप्राण्यांचे सर्वंधन होण्यास मदत होऊन छायाचित्रकाराच्या माध्यमातून एक प्राणी बचाव ही चळवळ राबविण्याची गरज असल्याचे सांगितले.आज जंगले नष्ट होऊन त्याठिकाणी वस्त्या उभा राहिल्यानेच वन्यप्राणी शहरासह गावखेड्यात येऊ लागले हे आपण स्विकारले पाहिजे असे सांगत जंगल बचाव मोहीमही आवश्यक असल्याचे म्हणाले.नागपूर विभागातील 30 ते 40 छायाचित्रकार या कार्यशाळेला उपस्थित होते.संचालन मुकुंदू धुर्वे यांनी केले.प्रास्तविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी मानले.आयोजनासाठी सावन बहेकार,रुपेश निंबार्ते,जसानी यांच्यासह विविध संघटनाच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.