28.4 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home विदर्भ देवळी येथे पावर ग्रीड परिसरात आग

देवळी येथे पावर ग्रीड परिसरात आग

0
28

वर्धा,दि.13 : देवळी येथील पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया परिसरातील केंद्रीय पारेषण कंपनीच्या ट्रान्स्फार्मर ला आग लागली आहे . या आगीत कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहेत . ३५०० लिटर ऑइल असलेले ट्रान्सफॉर्मरचे नुकसान या घटनेमध्ये झाले असून वर्ध्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या ७६५ केव्ही ट्रान्समिशन ला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे .गुरुवारला सायंकाळच्या सुमारास ही आग लागल्याने आग आटोक्यात आणण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु होते . परंतु नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले
नाही .