27 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home राजकीय यशवंत जाधव यांची मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

यशवंत जाधव यांची मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

0
39

मुंबई दि. 28– मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी माझगावमधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या यशवंत जाधव यांची निवड़ करण्यात आली असून जाधव यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करण्यात आल्याचे जाहीर केले. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. शिवसेनेचे नगरसेवक मुंबईच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृहात शिवसेनेची भूमिका खंबीरपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे उपनेते नगरसेवक यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड केली आहे, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

यशवंत जाधव हे महापालिका निवडणुकीत माझगावमधून ते तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. १९९७ मध्ये जाधव हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदा ते वॉर्ड क्रमांक २०९ मधून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत सात वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद तसेच स्थापत्य समिती शहर, प्रभाग समिती अध्यक्षपद तसेच बाजार व उद्यान समिती अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड झाल्याने ते या शर्यतीतून बाद झाल्याचे मानले जाते. महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसल्यास आता यशवंत जाधव यांना सभागृह नेतेपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे.