पेट्रोल दर प्रती लिटर 33 रुपये करा : काँग्रेस

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशभरात पेट्रोलची किंमत 33 रुपये लीटर करावी, अशी मागणी आज काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी पत्रकार परिषेत घेत, पेट्रोल दरावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.

केंद्र सरकारनं कालच पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांची वाढ केली. गेल्या 12 नोव्हेंबरपासून पेट्रोलवरच्या उत्पादन शुल्क पावणे सहा रुपये, तर डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात साडे चार रुपये वाढ केली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळत असले, तरी त्याचा पूर्ण फायदा ग्राहकांना मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

इंधनावर लावण्यात येणारे कर कमी केले, तर पेट्रोलच्या किमती 33 रुपयांवर येतील असा काँग्रेसचा दावा आहे. केंद्रसरकारानं हा युक्तीवाद स्वीकारून देशात पेट्रोल 33 रुपये लीटरनं विकावं अशी मागणी आज काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केली.