भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे

0
21

नवी दिल्ली-भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मंगळवारी केंद्रीय मंत्री आणि खासदार रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे दानवे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दानवे यांनी मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी जे. पी. नड्डा यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याने नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार हे निश्चित होते. या पदासाठी पक्षामध्ये दानवे आणि आशीष शेलार यांची नावे चर्चेत होती. दानवे हे मराठवाडय़ातील नेते असून, गेली अनेक वर्षे ते जालन्याचे खासदार आहेत आणि राजकारणातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. राज्यातील परिस्थितीची व प्रश्नांची त्यांना जाण आहे. राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्यापेक्षा राज्यात परत येऊन प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे तुलनेने अधिक चांगले असल्याने दानवे यांनीही त्यासाठी होकार दिला होता

रावसाहेब पाटील दानवे
मुळगाव जवखेडा ता. भोकरदन जिल्हा जालना.
मूळ व्यवसाय शेती, जवखेडा मुळगावी संपूर्ण एकत्र कुटुंब.

• मराठवाड्यातील मोठा मराठी चेहरा
• जालना मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला बनवला.
• जनसामान्यांना जोडून ठेवणे, लोकसंग्रह मोठ्या प्रमाणात केला.
• कार्यकर्त्यांचे मोहोळ आपल्या मृदू भाषा शैलीतून जमवले.
• कायम समाधानी.
• पक्षाने सोपवलेल्या जबाबदार्या पार पाडल्यामुळे नवनवीन जबाबदारी
सोपवली त्यामुळे पक्षाने भरभरून दिल्याचे कार्यकर्त्यांना नेहमी सांगतात.
• नेहमी समाधानी, काहीही न मागता खूप काही दिल्याचे म्हणतात.
• अनेक असामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या उंचीवर पोहचवले, प्रतिनिधिक
उदाहरण : आत्माराम सुरडकर (मोलमजुरी करणारा कार्यकर्ता) जिल्हा अध्यक्ष
नारायण कुचे यंदा आमदार,
तुकाराम जाधव यंदा जालना जिल्हा परिषद अध्यक्ष.
• जनहितासाठी आक्रमक, कठोर प्रशासक.जनतेच्या प्रती तितकेच हळवे.
• सहकार क्षेत्रातून विविध संस्था उभारल्या. पदे भूषवली. जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन, रामेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन, जवखेडा ता. भोकरदन येथील सोसायटी चेअरमन ते मार्केट कमेटी, खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेसिंग, दुध संघ या संस्थावर संचालक.

भारतीय जनता पार्टीतील वाटचाल
• जवखेडा या गावचा भारतीय जनता पार्टी चे शाखा प्रमुख.
• भारतीय जनता पार्टी भोकरदन तालुका अध्यक्ष.
• भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा अध्यक्ष.
• भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र.
• प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र.
लोकप्रतिनिधी म्हणून वाटचाल
• ग्रामपंचायत सदस्य
• पंचायत समिती सभापती,
• आमदार,
• खासदार, • केंद्रीय राज्यमंत्री.
• राजकारण करतांना सामाजिक भान बाळगणारा नेता म्हणूनच सर्व जाती
धर्माचे सर्व विशेषतः दलित, मुस्लीम, इ. घटकाचा संचय.
• अडवाणीजींची रथयात्रा आणि दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा केला.
• दिवंगत नेते श्री प्रमोद महाजन, श्री गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात जडण घडण. झालेला कार्यकर्ता.
• सामाजिक, प्रशासकीय, राजकीय क्षेत्रातील इत्यादी सर्वच पातळीवर
महत्वाचा निर्णय घेण्यासाठी जेष्ठ नेते नितीनजी गडकरी यांचे मार्गदर्शन.
• यामुळे राज्याच्या काना कोपर्यातील विविध घटकांचे प्रश्न समजले,
दोन वेळा आमदार, सलग चौथ्या वेळा खासदार म्हणून काम करतांना सभाग्रुहात जनहिताच्या अनेक विषयांवर सहभाग घेऊन त्यांचे प्रश्न मांडले.
• भोकरदन येथील एक निरीक्षण : त्यांच्या निवासस्थानी सतत कार्यकर्त्यांचा राबता असतो. साहेब सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. कार्यकर्ते निव्वळ भेटीसाठी येतात. बऱ्याच वेळा त्यांचे काहीही काम नसते असे दिसून येते. साहेबांची भेट आणि पाठीवर थाप मिळाली कि तो काम झाल्याच्या अविर्भावात परततो.
• ग्रामीण बाज, समोरच्या श्रोत्यांना समजेल अशी त्यांचीच भाषा बोलून
त्यांच्या मनात घर करण्याचे कौशल्य.
• कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखून त्यांना सांभाळण्याचे कौशल्य.
• आत्तापर्यंतच्या २३ निवडणुकांपैकी २२ निवडणुका सतत जिंकल्या.
• जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले, मराठवाड्यात उद्योग टाकून रोजगार निर्माण करण्यासाठी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. जिल्हा सहकारी बँक, खरेदी विक्री, मार्केट कमिटी, जिनिंग प्रेसिंग, दुध संघ यातून कार्यकर्त्यांचा संचय.

• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष श्री. अमित शहा यांनी सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल असा विश्वास ते व्यक्त करतात.
• आता केंद्र आणि राज्यात दोन्ही कडे सत्ताधारी पक्ष असल्यामुळे
सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देणे यासाठी प्रयत्न करणार.
• राज्यात पक्ष सदस्य नोंदणी १ कोटी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार.
• पक्षाला तळागाळात पोहोचविण्यासाठी आणि केंद्र,राज्य सरकारची कामे जनमानसात पोहोचवण्यासाठी पर्यंत करणार, यापूर्वी एन. डी. ए. सरकार आणि युती सरकार कमी पडले होते आता सरकारचे काम सर्वसामान्यांत पोह्चविण्याची जबाबदारी पेलणार