शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज

0
7

गोंदिया,दि.२६: शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन २६ मे रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सकाळी १0 वाजता करण्यात आले आहे. या बैठकीत गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या १ जून रोजी शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेच्या विविध समस्या शासनाला अवगत करून देण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या आंदोलनाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा आयोजित बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक सहारे, उपाध्यक्ष झलक बिसेने, महेश शर्मा, महासचिव राजेश दवे, हुकूमचंद अग्रवाल, आशाताई पाटील यांनी केले आहे.