37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंह JDU संसदीय दलाचे नेते

शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंह JDU संसदीय दलाचे नेते

0
27

blank

नवी दिल्ली,दि.12 – नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले जदयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांची जदयू संसदीय दलाच्या नेतेपदावरून हकालपट्टी झाली आहे. त्यांच्या जागी आरसीपी सिंह यांना जबाबदारी देण्यात आली आहे.शुक्रवारी जेडीयू प्रमुख नितीश कुमार म्हणाले होते की, त्यांनी (शरद यादव) त्यांना पाहिजे तिथे जावे, पक्षाने आपला निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, अमित शहा यांनी नितीश यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले अाहे. शहा यांनी शुक्रवारी त्यांना दिल्लीतील आपल्या घरी चहापानावर बोलावले. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली.जदयू नेते वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले, त्यांना (शरद यादव) हटवलेले नाही, रिप्लेस केले आहे. त्यांच्या सध्याच्या अॅक्टिव्हिटीज पाहता हे करणे गरजेचे होते.गुजरात राज्यसभा इलेक्शनमध्ये जदयूच्या एका MLAने पक्षाचा आदेश डावलून काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांना मतदान केले होते. नंतर शरद यांनी पटेल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले होते. या घटनाक्रमानंतर नितीश यांनी गुजरातच्या पक्ष प्रभारींना बरखास्त केले होते, ते शरद यांच्या जवळचे होते. यानंतरच शरद यांच्यावर कारवाईचा अंदाज व्यक्त केला जात होता.

blank