केजरीवालांविरोधात जया प्रदा यांना भाजपची उमेदवारी?

0
8

नवी दिल्ली : अभिनेत्री जया प्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात त्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आंध्रप्रदेशात एनटी रामाराव यांच्या सानिध्यात आल्यावर जया प्रदा यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करुन खासदारकीही मिळवली. मात्र सपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता जया प्रदा लवकरच भाजपला जवळ करणार आहेत.

खरंतर नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात प्रबळ दावेदाराच्या शोधात भाजप आहे. सुत्रांच्या माहितीनुसार यासंदर्भात माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनाही विचारणा करण्यात आली होती, पण त्या तयार झाल्या नाहीत. त्यामुळे भाजप या जागेसाठी सेलिब्रिटी उमेदवाराच्या शोधात होती.

आता जया प्रदा यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या शक्यतेमुळे नवी दिल्लीत केजरीवाल यांच्याविरोधातील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.