मुंबई: देशातील गरजूंना अनुदानित सिलेंडरचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला अनुदानित सिलेंडरचा कोटा सरेंडर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा आदर्श मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि विरोधीपक्षातील नेते कधी घेणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.काही दिवसांपूर्वी पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी देशातील राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्वत: फोन करुन सिलेंडर सरेंडर करण्याचं आवाहन केलं होतं.
या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला कोटा सरेंडर केला. याशिवाय अर्थमंत्री अरुण जेटली, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, झारखंडचे मुख्यमंत्री रमणिसंह , केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनीही कोटा सरेंडर केला आहे.त्यामुळं महाराष्ट्रातील दिग्गज नेते हा आदर्श कित्ता कधी गिरवणार याची उत्सुकता आहे.
मुख्यमंत्र्यांनी अनुदानित सिलेंडरचा कोटा सोडला, इतर मंत्री आदर्श घेणार का?
वाढदिवसाच्या शुभेच्छा