41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय शिवसेना फुटणार, 20-22 आमदार भाजपत जाणार: रवी राणा

शिवसेना फुटणार, 20-22 आमदार भाजपत जाणार: रवी राणा

0
26

blank

मुंबई,दि.22 : शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. कारण शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील, ते भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केल्याचे वृत्त एबीपी या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.राणा यांच्यानुसार “शिवसेनेने दसरा मेळाव्यात पाठिंबा काढण्याची घोषणा केली, तरी काही फरक पडणार नाही. कारण आम्ही अपक्ष 6 आमदार देवेंद्र फडणवीसांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. इतकंच नाही तर शिवसेनेने पाठिंबा काढला तर त्यांचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील. त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार अजिबात अल्पमतात येणार नाही”दुसरीकडे रवी राणा यांनी शरद पवारही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील, असाही दावा केला आहे.रवी राणा म्हणाले, ”शरद पवार यांचा नागरी सत्कार प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. जिकडे- जिकडे सत्कार होईल तिकडे तिकडे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं काम सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवारही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.

blank