शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने उधळले ९८.३३ लाख

0
12

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने तब्बल ९८.३३ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे.
मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठे यश मिळाले. सत्तेत आलेल्या भाजपाचा ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य स्वरुपात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपाने तब्बल ९८.३३ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे.
एकीकडे राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत होते. मात्र असे असतानाही भाजपाने सत्ता स्थापनेच्या सोहळ्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला. या रंगतदार सोहळ्यासाठी भाजपाकडून ९८.३३ लाख रुपये खर्च करण्यात आले.
माहिती अधिकार कायद्याचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वानखेडे स्टेडियमवर भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्यात किती खर्च झाला याची माहिती महाराष्ट्र सरकार आणि भाजपाच्या मुंबई विभागाकडे माहिती मागितली होती. यावेळी भाजपाच्या खर्चाची माहिती देण्यात आली. दरम्यान, या खर्चाबाबत भाजपाच्या मुंबई विभागाकडे विचारणा केली असता तेथून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे गलगली म्हणाले.