राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरांपर्यंत पोहोचवा-खा.पटेल

0
9

भंडारा,दि.24 : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी आजवर केंद्र किंवा राज्य सरकारने एकही योजना राबविली नाही. सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही. पोकळ आश्वासने आणि दिशाभूल करणाऱ्या शासनाला जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढवून राष्ट्रवादी पक्ष घराघरापर्यंत पोहोचविला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार अनिल बावनकर, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, सभापती शुभांगी राहांगडाले, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी उपस्थित होते.
यावेळी नाना पंचबुद्धे, रामलाल चौधरी, किरण अतकरी, संगीता सुखानी यांनी पक्ष संघटन वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले. संचालन महासचिव विजय पारधी यांनी तर आभारप्रदर्शन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नितेश फुलेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला श्रीकृष्ण पडोळे, बाबूराव मते, विठ्ठलराव कहालकर, श्रीधर हटवार, प्रमिला साकुरे, यशवंत ढबाले, केशवराव बांते, प्रदीप बुराडे, शामराव गजभिये, कार्तिक ईश्वरकर, विजय डेकाटे, राजू कारेमोरे, कल्याणी भुरे, किरण अतकरी, हरिभाऊ डोये, राजकुमार माटे, महादेव पचघरे, अश्वनिता लेंडे, रिता हलमारे, अरुण तितीरमारे, संजय मिरासे, लोमेश वैद्य उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शहर अध्यक्ष किशोर पातरे, नगरसेविका मनिषा गायधने, ज्ञानेंद्र आगाशे, सुरेंद्र वंजारी, फिरोज शेख, धीर पाटील, नवीन भैसारे, हितेश साठवणे, क्रिष्णा पराते, विनोद नंदनवार, मुरलीधर गायधने, कशील आंबागडे, राहुल मेहर, कदीर शेख, संजय मिरासे, दिलीप गजभिये, कैलाश तितीरमारे, राजेश लेंडे, मदन गडरिये, नरेश ईश्वरकर, रमेश चाचीरे, प्रदीप बुराडे, रामरतन खोकले, श्याम कांबळे, अरुण तितीरमारे, सदाशिव ढेंगे, नरेंद्र पिकलमुंडे, संजय टिकापाचे, अरविंद येळणे, मंगेश साऊसाखरे, निर्मला पाटील, अनिल सोनवाने, घनश्याम कुंभरे, महादेव फुसे, संजय शेंडे, विनोद बाभरे, राहुल वानखेडे, सोनू रामटेके, गणेश बांडेबुचे यांनी सहकार्य केले.