25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १ सप्टेंबरला वाशिममध्ये

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १ सप्टेंबरला वाशिममध्ये

0
29

वाशिम, दि. ३१: केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले हे दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता नागपूर येथून मोटारीने वाशिमकडे प्रयाण करतील. दुपारी १ वाजता त्यांचे वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. याठिकाणी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या शुभारंभ कार्यक्रमास ना. आठवले उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता ते नागपूरकडे प्रयाण करतील.