नवी दिल्ली : कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना आरोपी करुन समन्स बजावल्यानंतर आता त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी अध्य़क्ष शरद पवार मनमोहन सिंह यांच्या भेटीला गेले आहेत.
मनमोहन सिंह हे प्रामाणिक आहेत, त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव आहे, त्यांना या प्रकऱणात गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी यापूर्वीच दिली होती. त्यानंतर आता पवार मनमोहन सिंहांना भेटून त्यांच्याशी चर्चा कऱणार आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानाहून प्रफुल पटेल सुप्रिया सुळे, तारिक अन्वर, विजयसिंह मोहिते पाटील, वंदना चव्हाण आणि इतर खासदार पायी भेटीला गेले आहेत.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांनी मनमोहन सिंह यांची भेट घेतली होती. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या खासदारांसह मनमोहन सिंह यांच्या भेटीला गेले आहेत.