जीवन सदैव प्रवाहित ठेवा – अपराजित

0
14

ब्रम्हपुरी,दि.02ः- आपण आपल्या गतस्मृतीशी प्रतारणा करता कामा नये. ब्रह्मपुरीत शिकलो, या लाल मातीने मला संस्कार दिले. व्याकरण चुकले तर चालेल पण आचरण चुकता कामा नये, आपल्या गावाशी, महाविद्यालशी नाळं जोडून ठेवा, स्पर्धा करा पण निकोप स्पर्धा करा आणि जीवन सदैव प्रवाहित ठेवा, असे विचार ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक श्रीपाद अपराजित यांनी मांडले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ‘वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता पुरस्कार’ वितरण समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थासचिव अशोक भैया होते.प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव अँड. भास्करराव उराडे, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोलीचे डॉ. ईश्‍वर मोहूर्ले, प्राचार्य नानोटी, प्राचार्य सुभाष बजाज तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी, डॉ. डी. एच. गहाणे, प्रा. विनोद नरड, डॉ. हर्षा कानफाडे, प्रभारी डॉ. राजेंद्र डांगे, डॉ. मोहन कापगते, डॉ.अजित खाजगीवाल, पर्यवेक्षक प्रा. सिडाम उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधींचा सेवानवृत्तीप्रसंगी पाहूण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व राशी देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक व परिचय प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडेंनी यांनी तर संचालन डॉ. मोहन कापगते यांनी केले. पुरस्कार वितरण संमारंभाचे संचालन प्रा. आकाश मेर्शाम, प्रा. खोब्रागडे यांनी केले. आभार डॉ. अजित खाजगीवालेनी मानले. यशस्वीतेसाठी मोहन वाडेकर, डॉ. तात्या गेडाम, डॉ. असलम शेख, डॉ. धनराज खानोरकर, डॉ.सुभाष शेकोकर, डॉ. प्रकाश वट्टी, डॉ. पद्माकर वानखडे, डॉ. ठावरी, डॉ. कुलजित गील, डॉ. दर्शना उराडे, अधीक्षक संगीता ठाकरे, प्रा. बोकारे तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,एनएसएसएन सीसीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.