गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नागरी सत्कार

0
16

गोंदिया,दि.०९ः- येथील डी.बी.सायंस महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती समारोह व सुवर्ण पदक वितरण कार्यक्रमाचे उदघाटक तथा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे गोंदिया जिल्ह्यात झालेल्या प्रथम आगमनप्रसंगी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.हा नागरी सत्कार त्यांना स्मृतीचिन्ह व शालश्रीफळ देऊन करण्यात आला.विशेष म्हणजे नगराध्यक्ष अशोक इंगळे,खासदार प्रफुल पटेल,मधुकर कुकडे,माजी खासदार नाना पटोले,मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल,आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.