31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राजकीय नवेगाव येथील हिलटॉप गार्डनचे भूमिपुजन उद्या

नवेगाव येथील हिलटॉप गार्डनचे भूमिपुजन उद्या

0
31

अर्जूनीमोर- क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मूलभूक सुविधा अंतर्गत निधी मंजूर 26 लाखाच्या निधीतून नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरातील हिलटॉप गार्डनचे भूमिपुजन उद्या 1 जूनरोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर हे राहतील.  प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती करूणा नांदगावे, जि.प. सदस्य रचना गहाणे, किशोर तरोणे, तेजुकला गहाणे, कमला पाऊलझगडे, गिरीष पालीवाल, मंदा कुंभरे, भास्कर आत्राम, पं.स.सदस्य खेमराज कोरेटी, नाजुका कुंभरे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.