लाखनी,दि.30ः-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशानुसार लाखनी तालुका अध्यक्षपदी प्रशांत वाघाये यांची निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रशांत वाघाये हे यापूर्वीपासून लाखनी तालुका काँग्रेसचे माध्यम समनव्यक म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक सुपरिचित आणि अष्टपैलू व्यक्ती म्हणून प्रशांत वाघाये यांची ओळख सबंध जिल्ह्यात आहे. जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे यांच्या हस्ते तसेच साकोली विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू रणदिवे, उपाध्यक्ष मोहन निर्वाण यांच्या प्रमुख उपस्थितीत साकोली येथे आयोजित युवक काँग्रेसच्या बैठकीत प्रशांत वाघाये यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय अ. भा. किसान काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये, म.प्र. कॉ.क. च्या प्रचार व प्रसार समितीचे सदस्य डॉ. अजय तुमसरे, सौ. सरोजताई वाघाये, निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील गिरेपुंजे, शहराध्यक्ष विशाल तिरपुडे, ज्येष्ठ काँग्रेस नेते ऍड. शफीभाई लद्धानी, पप्पू गिरेपुंजे, महादेवजी गायधनी, माजी नगराध्यक्ष कल्पना भिवगडे, नरेंद्र वाघाये, जि. प. सदस्य विनायक बुरडे, आकाश कोरे, वंदना पंढरे, प. स. सभापती खुशाल गिदमारे, माजी पं. स. सभापती दादुभाऊ खोब्रागडे, रजनी आत्राम, उमराव आठोडे, विजय वाघाये, राजू निर्वाण, दत्ता गिरेपुंजे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मीनाक्षीताई बोपचे, युवक काँग्रेसचे मोहन निर्वाण, निखिल सिंगनजुडे, सुरज पंचबुद्धे यांना दिले.
येणाऱ्या दिवसात युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय युवक काँग्रेसच्या बैठका घेऊन युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण देईल व संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आलेल्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन यशस्विरित्या लाखनी तालुका युवक काँग्रेसच्यावतीने वतीने करण्यात येईल. युवक नोंदणी कार्यक्रम नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी सुरू केला असून बैठका देखील सुरू झाल्या आहेत, असे प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत वाघाये यांनी याप्रसंगी केले.





