शिक्षक सहकारी पतसंस्थेत भेदभाव?

0
17

साखरीटोला : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदियाव्दारा शिक्षकांना कर्जवाटप करताना स्वत:च्या मर्जीतील व गटातील शिक्षकांना प्राधान्य देऊन इतरांना डावलले जात असल्याचा आरोप आमगावचे शाखाध्यक्ष एस.जी. नागपुरे यांनी केला आहे.
जिल्ह्यातील ८0शिक्षकांचे अर्ज कर्जाकरिता पतसंस्थेला प्राप्त झाले होते. यासाठी दि.२९ फेब्रुवारी २0१५ ला २कोटी ७0 लाख रुपयांचे प्रपोजल मंजूर करण्यात आले होते.यात सालेकसा पंचायत समिती अंतर्गत ८ अर्ज होते. त्यातील एच.एस. वाघमारे, एस.जी. बनोठे, कौशल्या तुरकर यांचे अर्ज ३१मार्चपर्यंत काढण्यात आले नव्हते तर केवळ ४अर्ज काढण्यात आले होते.त्यानंतर दि.२५ मार्च २0१५ ला दुसरे प्रपोजल एक कोटी ६६ लाख रुपयांचे मंजूर करण्यात आले.
त्यात सालेकसा पं.स. अंतर्गत ८ अर्ज होते. त्यापैकी एकही अर्ज काढण्यात आला नाही.यात टी.के. मेश्राम, व्ही.एन.सांगोळे, एम.एल. कटरे, जे.डी.गोलीवार, एल.एम. नाकाडे, टी.बी.नागपूरे, के.बी. नागपुरे, एस.एम.कटरे यांचा समावेश आहे.
पहिले व दुसरे प्रपोजल मंजूर होऊनही पहिल्या प्रपोजलचे अर्ज न काढता नंतर प्राप्त झालेले अर्ज काढण्यात आले. यात सालेकसा तालुका अंतर्गत समितीचे पदाधिकारी यांनी टाकलेले १५मार्च २0१५ नंतरचे अर्ज निघाले आहेत.यात एस.बी.दमाहे, आर.डब्ल्यू.जैन, ए.एन. खरडकर, डी.एस.कुराहे यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेत.मात्र ज्या शिक्षकांनी डिसेंबर २0१४ मध्ये कर्जाकरिता अर्ज भरले होते, यात त्यांच्या भावाचे व मुलीचे लग्न होऊन गेले तरी ते कर्जमिळाले नाही.यात एस.टी.लांजेवार, एस.सी.बनोठे, झेड.एफ. ढेकवार, टी.एफ.बरैया, डी.जे. मेश्राम यांचा समावेश आहे.
एस.जी.नागपूरे हे पतसंस्थेचे संचालक आहेत.मात्र त्यांना सुध्दा अजूनपर्यंत कर्ज मिळू शकले. सत्ताधारी संचालक मंडळ आपली मनमानी करित असल्याचा आरोप नागपूरे यांनी केला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ कर्जवाटपात भेदभावपूर्ण व्यवहार करित असल्याने अनेक शिक्षक कर्जापासून वंचित असल्याचे नागपुरे यांनी म्हटले आहे.