राणेंची पराभवाच्या दिशेने वाटचाल, तृप्ती सावंत आघाडीवर

0
13

मुंबई, – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून 11 फेरीअखेर शिवसेनेच्या तृप्ती सावंत या आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत तृप्ती सावंत यांना 43083 मतं मिळाली असून नारायण राणे यांना 23342मतं मिळाली आहेत. एमआयएमचे रेहबार सिराज खान यांना 7074 मतं मिळाली आहेत.

शिवसेना आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने वांद्रे पूर्व व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आर.आर. पाटील यांच्या निधनाने तासगाव या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेने बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने थेट नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत रंग भरला आहे. एमआयएमचे रेहबार सिराज खान हे निवडणूक लढवत असल्याने या तिरंगी निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.