‘बाबासाहेबांआधी मदर तेरेसांना भारतरत्न का?’, सरकार्यवाह भैय्याजी जोशींचा सवाल

0
10

नवी दिल्ली: बाबासाहेब आंबेडकर यांच्याआधी किमान 10 वर्ष काँग्रेसनं मदर तेरेसांना भारतरत्न देऊन कसे गौरवलं? असा सवाल करुन संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर आणि पांचजन्यनं 200 पानांचा खास अंक नवी दिल्लीत प्रकाशित केला. यावेळी भैय्याजी जोशी यांच्याह केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोतही उपस्थित होते. दलित व्होटबँकेची ताकद लक्षात घेऊन संघानं आता हे नवं पाऊल उचलले आहे.
विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचं कायम समर्थन करत आलेले आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य नरेंद्र जाधवही यावेळी उपस्थित होते. जर संघ आणि भाजपातली दरी कमी करु शकलो तर आपणाला आनंदच होईल असंही यावेळी नरेंद्र जाधवांनी म्हटले आहे.
यावरुन देशात एकच खळबळ माजली आहे,ज्या भैय्याजी जोशींनी भारतरत्नचा मुद्दा उपस्थित केला त्याच मुद्दाला घेऊन भाजपसरकारने अटलबिहारी बाजपेयी यांच्याआधी महात्मा फुल्यांना का भारतरत्न दिला नाही असा सुर आता बहुजन चळवळीतील विचारवंत व्यक्त करु लागले आहेत.बाबासाहेब व मदर तेरेसाच्या नावे राजकारण करणारे फुल्याना कसे विसरले अशाही सूर भैय्याजी जोशी यांच्या या प्रतिक्रियेनंतर येऊ लागल्या आहेत.