30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय बसपकडून कमल हटवार तिरोड्यात निवडणुक लढण्याच्या तयारीत

बसपकडून कमल हटवार तिरोड्यात निवडणुक लढण्याच्या तयारीत

0
37

तिरोडा,दि.27ः-येत्या 21 आक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास रिंगणात उतरण्याची तयारी बसपचे सक्रिय पदाधिकारी कमल हटवार यांनी सुरु केली आहे.हटवार हे फुले शाहू आंबेडकरी विचांराना घेऊन गेल्या एक दशकापासून तिरोडा मतदारसंघात काम करीत आहेत.सोबतच ओबीसी समाजातील जनतेला जागृत करण्यासाठी ते सर्वत्र आंदोलनात्मक भूमिकेत असो की विविध कार्यक्रमात नेहमीच पुढे बघायला दिसून येत असून बसपच्या युवा कार्यकर्त्यामध्ये त्यांच्या कार्याविषयी चर्चा दिसून येत आहे.गोरेगाव तालुक्यात जन्मलेले कमल हटवार हे तेली समाज संघटनेचे सक्रीय पदाधिकारीही आहेत.त्यांच्या निवडणुक लढण्याच्या घोषणेने बसपच्या युवा कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीही मागितली आहे.पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण मातब्बर राजकीय पक्षांच्या नेत्यांना नक्कीच लढत देऊ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.