नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.29ः “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मवाटप केल्यानंतर आता काँगेसने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहीर केली असून पहिल्याच यादीत माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर उत्तर येथून नितीन राऊत,ब्रम्हपूरी येथून विजय वड्डेटीवार,तिवसा येथून यशोमती ठाकुर,सावनेरातून सुनिल केदार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वरोरा येथून चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर,चिमूर येथून सतिश वारजुरकर,यवतमाळ येथून अनिल बाळासाहेब मनगुळकर,धामणगाव रेल्वे विरेंद्र जगताप,लातुर शहर अमित देशमुख,धारावी वर्षा गायकवाड,आर्वी अमर काळे आदींना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.पुर्व विदर्भातील गोंदिया भंडारा जिल्ह्यांना स्थान नाही.या यादीत नाना पटोले,सेवक वाघाये यांचाही कुठेच नाव नाही.




