मुंबई,दि.04ः- अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाच्या मदतीने निवडून आलेले युवा स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे पोपट आहेत असा खोचक टोला लगावला आहे. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त करीत शिवसेनेने मुजोरी थांबवली नाही तर शिवसेनेचे किमान २५ आमदार मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील असाही विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. तसेच रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना रवी राणा यांनी शिवसेनेचे पोपट असे म्हटल्याने आता यावर संजय राऊत काही बोलणार का? याकडे लक्ष लागले आहे.





