25.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय जि.प. व प.स. निवडणुकीच्या कामाला लागा:- नानाभाऊ पंचबूध्दे

जि.प. व प.स. निवडणुकीच्या कामाला लागा:- नानाभाऊ पंचबूध्दे

0
59
लाखान्दुर,दि.23:- तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व कृषि बाजार समिती तर्फे नवनिर्वचीत आमदार राजूभाऊ कारेमोरे व आमदार मनोहर चंद्रीकापुरे  यांचा सत्कार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबूद्धे यांच्या अध्यक्षतेखाली,म.प्र.महासचिव धंनजय दलाल,माजी खासदार मधुकर कुकडे तालुकाध्यक्ष बालुभाऊ चुन्ने,उपसभापती देवीदास राऊत,यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा पार पड्ला.
राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचे हाथ बळकट करण्यासाठी व लाखान्दुर राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढ़विण्यासाठी,शेतकरी शेतमजुर,व सर्व जनतेच्या विकास करिता आम्ही कटिबध्द आहोत. जनतेचे कामे करा त्यांचे मने जिंका तेव्हाच जि.प.व प.स जिंकणे सोप होईल अशी सुचना मान्यवरानी केली. कार्यकर्त्याना नागरिकांचे काम करताना अडचण येऊ नये.म्हणून आमदार मनोहर चंद्रीकापुरे यानी तालुका दत्तक घेतला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फटाके मिठाई,वाटप व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्या वेळी युवक तालुकाध्यक्ष अँड मोहन राऊत,शंकर खराबे,सुभाष दिवटे,बबन पिलारे,लोचन पारधी,खुशाल मोहरकर ,संतोष गोंधळे,सुधोधन टेम्भुर्ने,बबन पिलारे,गौतम रंगारी,रंगारी महाराज,धनराज वासणिक,मारोती चाचेरे,मिलिंद डोंगरे,वसंता तर्हेकर,राष्ट्रपाल लोणारे,गोविंदराव बर्डे,व शेकडो कार्यकर्ता उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामजिक न्याय विभागाचे जी.प.प्रमुख कैलास रामटेके व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बालुभाऊ चुन्ने व आभार मोहन राऊत यानी केले.