36.9 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home राजकीय भंडारा नगराध्यक्ष मेंढेविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

भंडारा नगराध्यक्ष मेंढेविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

0
1045

भंडारा,दि.03ः-भंडारा नगर परीषदेचे नगराध्यक्ष तथा भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांचेविरूध्द भंडारा नगरपरिषदेच्या 18 नगरसेवकांनी आज जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे सायकांळी 4.20 वाजता अविश्वास प्रस्ताव दाखल केला.मेंढेविरुध्द दाखल झालेल्या अविश्वासप्रस्तावाने नगरसेवक नितिन धकाते यांच्या भुमिकेला बळ मिळाले तर भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.आता जिल्हाधिकारी अविश्वास प्रस्तावाकरीता सभा कधी बोलावतात याकडे लक्ष लागले आहे.