पेंशनला घेऊन सेवानिवृत्त कर्मचाèयांचे आंदोलन

0
251

गोंदिया,दि.03-गेल्या दोन महिन्यापासून सेवानिवृत्त कर्मचाèयांना पेंशन न मिळाल्याने आज मंगळवारला गोंदिया पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर सेवानिवृत्त कर्मचाèयांनी पेंशनच्या मागणीला घेऊन आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. शिक्षकेत्तर व शिक्षकांची १९ पेंशन व जानेवारी व फेबुवारी या दोन महिन्याचे पेंशनचे वेतन अद्यापही न देण्यात आल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढावल्याचे या कर्मचाèयांचे म्हणने आहे.आंदोलनात अनिल गौतम,घरसेले,उ.ल.यादव,एच.व्ही.बिसेन,पारधी,शेंडे आqदचा समावेश होता.अनुदान नसल्यामुळे पेंशन होत नसल्याचे पंचायत समिती प्रशासनाचे म्हणने आहे.तर जिल्हा कोषागार अधिकारी सुध्दा सेवानिवृत्त कर्मचाèयांच्या वेतनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने पुन्हा बुधवारला सकाळ११वाजता पंचायत समितीसमोर आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन अधिकारी नरेश भांडारकर हे पंचायत समितीमध्ये येऊनही त्यांनी आंदोलकांची बाजू न एैकून घेता मागच्या दाराने निघून गेल्याने अधिक संताप व्यक्त करण्यात येत आहे.