भंडारा,,दि.22ः जगात आणि देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असुन सरकारने लॉकडाउनचे आदेश जारी केले असतांना अनेक व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत. यादरम्यान रोज मजूरी करणारे मजुर मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या कालावधीत मजुरी अभावी अनेकावर उपासमारीचे संकट परिसरात बघायला मिळत होते. दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अखिल भारतीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार तसेच विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री सुनील केदार,राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांंनी जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यातील गोरगरीब मोलमजुरी करणारे कुणीही व्यक्ती लॉकडाउन दरम्यान उपाशीपोटी राहु नये यासाठी जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा सुरु केला आहे. भंडारा जिल्ह्यात कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात जवळपास पन्नास हजार कुटुंबांपर्यंत सदर अन्न धांन्य लॉकडाउन वाढल्यास टप्प्याटप्याने पोहचविण्यात येतील असे उद्दिष्ट्ये काँग्रेसचे असल्याचे प्रेमसागर गणवीर यांनी सांगितले. पहिली खेप हि प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रानुसार पाठविण्यात आली आहे. अति गरजु लोकांच्या घरी शिधा किट पोहोचत्या करून सदर मदत करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, जिल्हा महासचिव महेंद्र निंबार्ते, अनीक जमा पटेल, मुकुंद साखरकर, दिलीप निखाडे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशकर, धर्मेंद्र गणवीर, जिल्हा सचिव नाहिद परवेझ, एनएसयूआय चे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, मंगेश हुमणे, सचिन फाले, शाहीन मून, आनंद चिंचखेडे, आकाश मेश्राम, धम्मदीप धारगावे, रजत रहांगडाले, रोशन दहेलकर, रमेश मसराम इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा, तालुका, तसेच जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन अति गरजूंना जिवनावश्यक किटचे वाटप करत आहेत. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वे व सूचनेनुसार सोशियल डिस्टेंसिंगचे पालन करून शिधा किटचे वितरण करण्याच्या सूचना प्रेमसागर गणवीर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी घेतलेल्या पुढाकाराने त्यांचे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आभार मानले. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा महासचिव तथा जिल्हा माध्यम समन्वयक महेंद्र निंबार्ते यांनी कळविले.





