भंडारा,दि22:- ऐन लग्न समारंभाचे हंगाम सुर होत असताना महाभयंकर कोरोना विषाणू ने देशात थैमान घातले,त्यांमुळे लग्न,वाढदिवस व अन्य कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली.कोरोना रोखण्यासाठी ते योग्यच होते,त्यासाठी महारास्ट्र शासनाचे कोटी कोटी आभार! बंदच्या काळात डेकोरेशन,कापड दुकान,किराणा दुकान,बँड वाजा,फेटा वाले,हारफूल दुकान,स्टील भांडे आलमारी,हॉटेल,सलून,हार्डवेअर,ज्वेलर्स,जनरल,भाजी विक्रेता,व अशा लहान मोठ्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,सदर धंदे वाल्यानी बैंक व पतसंस्थे कडून कर्ज घेऊन जूडवाजुडव केली व दुकानदार्या थाटल्या,हे हातावर कमवुन खाणार्या व्यवसायिक बंदच्या फटक्यात दुर्दैवी जिवन जगत आहेत,दरवर्षीचे नैसर्गिक अस्मानी संकट व कोरोना चा महाप्रकोप त्यामूळे पेरलेल्या उधर्याही येणे बंद झाले,ग्रामीण भागातील दोनतीन वर्षापासुन धंद्याची बेकार झालेली अवस्था व ऐन लग्न सराईच्या तोंडावर कोरोना आपत्तीत झालेले लॉकडाऊन लहान मोठे व्यवसायावर आलेले बेकरी व उपासमारीचे संकट आहे.बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून कित्येक युवकांनी स्वयंरोजगार निर्मिती केली,अनेक रोजगार अभावी बेरोजगार झाले आहेत.
अशा बेरोजगाराना रोजगार भत्ता व व्यवसायांना सरसकट कर्ज माफ करावा अशी मागणी भारतिय युवा बेरोजगार संघटनेनी केली आहे.संस्थापक बालुभाऊ चुन्ने,अँड,मोहन राऊत,शीलमजू सिहगडे,राकेश राऊत,प्रकाश हेमने,छगन हेमने,हितेश झोडे,योगेश चुटे,पुन्डलीक शेंडे,ललित दाणे,मनोज बडोले,व अन्य कार्यकर्तानी मागणी केली आहे.
छोट्या व्यवसायीकांचा सरसकट कर्ज माफ करा:-भारतिय युवा बेरोजगार संघटने ची मागणी
□बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्यात यावा□





