25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home राजकीय खडसे,मुंडे,बावनकुळे,तावडेंना भाजपने डावलले,मोहीते,दटके,गोपछेडे व पडळकरांना संधी

खडसे,मुंडे,बावनकुळे,तावडेंना भाजपने डावलले,मोहीते,दटके,गोपछेडे व पडळकरांना संधी

0
258

मुंबई(वृत्तसंस्था)दि.08:येत्या 21 मे रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या 9 जागापैका 4 जागासांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे , पंकजा मुंडे , विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी लांबवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत.तर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारातमी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती.प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आहेत.त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपाचे नेते होते. अजित गोपछेडे हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या चारही नेत्यांना भाजपाकडून संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता २१ मे रोजी होणारी विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात होते.दरम्यान, सध्याच्या समीकरणांनुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचा एक असे मिळून महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपाचे तीन आमदार थेट निवडून येऊ शकतात. मात्र नवव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भाजपाने चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने आता चूरस निर्माण होणार आहे. तर आता काँग्रेसनेही दुसरा उमेदवार विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.