राज्यपालांना धक्काबुक्की; पाच आमदार निलंबित

0
9

मुंबई- राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी (बुधवार) निलंबित करण्यात आले आहे. राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर काळे, जयकुमार गोरे व वीरेंद्र जगताप अशी निलंबित केलेल्या आमदारांची नाव आहेत.

राज्यपाल विधीमंडळात अभिभाषणासाठी आले होते. यावेळी शिवसेना व कॉंग्रेसच्या आमदारांनी त्यांची गाडी अडवून धक्काबुक्की केली होती. यावेळी राज्यपालांच्या हाताला किरकोळ इजा झाली होती. राज्यपालांना धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते एकनाथ खडसे यांनी मांडला होता. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि कॉंग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शिवाय, प्रकरण मिटवण्याची विनंतीही विधानसभा अध्यक्षांना केली होती. परंतु, राज्यपालांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे खडसे यांनी सभागृहात सांगितले. अखेरीस या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.