23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home राजकीय विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध,मुख्यमंत्री ठाकरे बनले आमदार

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध,मुख्यमंत्री ठाकरे बनले आमदार

0
232

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), श्री. संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी दि.१२ रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे

श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).

श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), श्री. रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी).

श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).

श्री. राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस).