24.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय रब्बी धानाला प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देत,३१ जुलैपर्यंत खरेदी करावे-आ.रहागंडाले

रब्बी धानाला प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देत,३१ जुलैपर्यंत खरेदी करावे-आ.रहागंडाले

0
572

तिरोडा,दि.30:- सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता रब्बी धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्याची मुदत ३० जून २०२० आहे. परंतु कोव्हिड – १९ च्या प्रादुर्भावाने असलेली संचारबंदी,लाकडाऊन, व वाहतूक बंदिमुळे तसेच बहुतांश शेतकऱ्यांची मळणी झाली नसल्याने आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर खरेदी करण्याची मुदत ३० जून ऐवजी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविण्यात यावे.तसेच लाकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे शेतमाल,भाजीपाल,दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परीस्थिती अत्यंत बिकट झाल्याने रब्बी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये बोनस देण्याची मागणी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.