24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ रस्ते व पूल दुरुस्ती कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करा-जिल्हाधिकारी

रस्ते व पूल दुरुस्ती कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करा-जिल्हाधिकारी

Ø  मान्सून पूर्वतयारी आढावा

0
402

भंडारा, दि. 30 :– वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट भागातील गावातील लोकांना संभाव्य धोक्याची जाणीव करुन देण्यासोबतच पूल व रस्स्त्यांचे दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी आटोपावे.  जलसंपदा विभागाने पूर निवारण यंत्रणा तसेच विद्युत  व पोलीस यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश  जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पावसाळयात बंद होणाऱ्या मार्गाची माहिती तयार करुन पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामासाठी निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी धोकादायक इमारतीत राहू नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मॉकड्रिल व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन एका दिवशी दोन तालुके या प्रमाणे तात्काळ करावे. होमगार्ड व नाविकांची यादी तयार करुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राहत शिबीराचे नियोजन करावे. सर्व तहसिलदारांनी ग्रामदक्षता समितीची सभा घेवून पुरपरिस्थितीबाबत चर्चा करावी व ग्रामस्थांना अवगत करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना दरमहा 5 किलो तांदुळ व कुटूंबास 1 किलो चना देण्याचे 19 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार देय्य आहे. उद्योग, कामगार, पोलीस, नगर परिषद व पंचायतीच्या प्रतिनिधींनी लाभार्थ्यांची यादी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे सादर करुन त्यासाठी केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या.आतापासून तयारी व मॉकड्रिलचे आयोजन करुन नदीकाठावरील पुरबाधित गावावर लक्ष केंद्रीत करा. कोणतीही अनुचित घटना घडून वित्त व मनुष्यहानी होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पुरामुळे दुषित पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा विभागाने र्निजंतुकीकरण व्यवस्था तयार ठेवावी, असे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मान्सून पूर्वतयारी बाबत प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी सादरीकरणाद्वारे  आपल्या विभागाच्या कामाची माहिती दिली. यावेळी जलसंपदा, तहसिल, नगरपालिका,नगरपचायत, बांधकाम विभाग, आरोग्य, पोलीस, विदुयत विभाग, राज्य परिवहन विभाग, गोसीखुर्द प्रकल्प, पुरवठा विभाग, आदि विभागाचा आढावा घेण्यात आला.  तसेच टोळधाड जनजागृती बाबत कृषी विभागाद्वारे माहिती देण्यात आली.