25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय लपून छपून आले पालकमंत्री,ढिसाळ प्रशासनाचा आढावा घ्ययला

लपून छपून आले पालकमंत्री,ढिसाळ प्रशासनाचा आढावा घ्ययला

0
845

गोंदिया,दि.०३::ऱाज्यात जसे कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत तीच परिस्थिती गोंदिया जिल्हाची.जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोना रुग्णांचा धोका जिल्ह्यातील जनतेला निर्माण झाला.त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचेही जिल्ह्याकडे दुर्लक्ष ऱाहिले नव्हे त्यांचा दबाव व प्रभाव ही पाहिजे तसा जिल्हा प्रशासनावर नसल्यानेच मनमानी कारभाराची संधी जिल्ह्यातील अधिकार्याना मिळाली.त्यातही करोना संसर्ग काळात पहिल्यांदा जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्र्याना ही जिल्ह्यात लपून यावे लागले असे म्हणण्याची वेळ आज आली.प्रसारमाध्य़मांना आपला दौरा न कळविता येण्याची गरज का पडली.तसेही जिल्हाधिकारी यांनी या काळात प्रसारमाध्य़माना ज्यापध्तीने माहिती देण्यास टाळाटाळ केली.आरोग्य अधिकार्यांना बोलण्यास मनाई केली.रुग्ण आढळल्यानंतरही माध्य़मांशी सवांद साधण्याएैवजी त्यांच्याशी दुरावाच टेवला.तोच दुरावा राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानी टेवण्यासाटीच आजचा दौरा म्हणावा की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे़.ऱाज्यमंत्री दर्जा असलेल्या जि.प.अध्यक्षाना य़ा दौर्याची माहिती नसल्याचे कळले.