26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home राजकीय प्रदेशाध्यक्ष बदलता बदलता ९ जिल्हाध्यक्ष बदलले

प्रदेशाध्यक्ष बदलता बदलता ९ जिल्हाध्यक्ष बदलले

गोंदिया जिल्हा कॉंग्रेसचे किरसान व भंडाराचे पंचभाई नवे अध्य़क्ष

0
1456

गोंदिया,दि.२४:: एकिकडे महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरु असतानाच बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील 9 जिल्हाध्यक्ष बदलण्याचा अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवलेला प्रस्ताव काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजुरी दिली.नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार चर्चा असताना मात्र तसे न होता पटोले समर्थकांच्या गळ्यात  गोंदिया व भंडारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली.गोंदिया जिल्हाध्य़क्ष पदावरून पुरुषोत्तम कटरे य़ांची उचलबांगडी करीत पटोले समर्थक एड नामदेवराव किरसान यांची नियुक्ती करण्यात आली.भंडारा येथे मोहन विठ्ठलराव पंचभाई यांची चंद्पूर शहर अध्य़क्ष पदावर प्रकाश देवतळे तर जिल्हाध्यक्ष पदावर रितेश सत्यनारायण तिवारीची निवड करण्यात आली आहे.ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी एड.विक्रांत चव्हाण,लातुर शहर एड.किरण जाधव,लातुर जिल्हाध्यक्ष श्रीशाली मलिक्कार्जुन उठगे,औरगांबाद जिल्हाध्यक्षपदी डाॅ.कल्याण काळे तर शहरअध्यक्षपदी  मोहम्मद उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गोंदियाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे गेल्या अनेक वर्षापासून या पदावर होते.माजी आमदार अग्रवाल यांचे समर्थक गणले जात असले तरी त्यांच्यासोबत ते पक्षसोडून गेले नव्हते.भंडारा व गोंदिया जिल्ह्यावर आता पटोले समर्थकांचे वर्चस्व जिल्हा काँग्रेस कमिटीवर आले असून येत्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकात त्या अध्यक्षांचा कस लागणार आहे. थोरातांचा जिल्हाध्य़क्ष बदल प्रस्ताव मंजुर केल्याने राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्वविराम मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बदलाला सुरुवात झाल्याने प्रदेशाध्क्षपद त्यांच्याकडेच राहणार हे स्पष्ट झाले आहे.