24.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home राजकीय विज बिल माफ करा व शेतक-यांना सरसकट  कर्जमाफी द्या

विज बिल माफ करा व शेतक-यांना सरसकट  कर्जमाफी द्या

भाजप सडक अर्जुनी च्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

0
217

सडक अर्जुनी,दि.29ः: कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरीक,मजुर,किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे.त्यामुळे विज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.त्यामुळे विज बिल माफ करावे तसेच शेतक-यांना खरीप हंगाम  मधील पिक कर्ज तात्काळ देण्यात यावे तसेच घरकुल बांधकाम व शासकीय काम रेती अभावी बंद झालेले आहेत त्यासाठी शासनाने त्वरीत उपलब्ध करुन द्यावे अशा इतर विविध मागणी भाजप सडक अर्जुनी च्या वतीने करण्यात आली.या संदर्भात तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना भाजप तालुका अध्यक्ष अशोक लंजे,महाराष्ट्र भाजप आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये,पंचायत समितीचे सभापती गिरधारी हत्तीमारे,उपसभापती राजेश कठाणे,विश्वनाथ रंहागडाले,बालकदास राऊत,दिलीप बोरकर,शिशीर येळे,विलास बागळकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.