स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने शॉर्ट मॅरेथॉन रॅली उत्साहात

0
13
बुलडाणा, दि. 20 : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाचे वतीने देशभरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्ताने आज दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथून शॉर्ट मॅरेथॉन रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी भुषण अहिरे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचेवतीने रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अजयसिंग राजपुत, प्रकाश क्षेत्रे, रविंद्र गणेशे, राजेश डिडोळकर, विजय वानखेडे, प्रा.नंदु गायकवाड, श्री.हिंगे, एम.एम.राजपुत, सुभाष गिऱ्हे, नितीन भिसे, डॉ. राजपुत, श्री नेवरे, राहुल औशालकर, निलेश शिंदे, भरत ओलेकर, डिगांबर पाटील, दिनेश मानमोडे, धनंजय चाफेकर, समाधान टेकाळे, प्रविण चिम आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम याप्रसंगी पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा आर्चरी स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुवर्ण पदक विजेता मिहीर अपार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व उपक्रमाच्या स्वरुपामध्ये 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 आठवड्यात 75 कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यानंतर 2023 पयंत सर्व राज्यात त्यांच्या स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम राबविणे याबाबत जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार आजचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवा निमित्त शॉर्ट मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी श्री. अहीरे यावेळी म्हणाले, नियमित सरावामुळे आरोग्यासोबत राष्ट्राचे, राज्याचे व जिल्ह्यासोबत स्वत:चे नाव कमविण्याची संधी खेळामुळे मिळते. त्यासाठी प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे.
या रॅलीमध्ये जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कबड्डी, खो खो, मैदानी, द्रोणाचार्य आर्चरी ॲकडमी चे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबतच विविध सघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी नागरीक सहभागी होते. संचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी व आभार क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी मानले. या कार्यक्रमात पोलीस प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे वतीने ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजक अनिल इंगळे, रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, विजय बोदडे, श्रीमती मनिषा ढोके, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, भिमराव पवार, गणेश डोंगरदिवे, दिपक जाधव यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा यांनी कळविले आहे.