क्रीडा क्षेत्रात करियरसाठी पालकांनी मुलांना पाठिंबा द्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
9

नाशिकदि 10: डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासारख्या विविध क्षेत्रात यश मिळविण्यासाठी तरूण पिढी मेहनत घेते आणि त्यांना आई वडिलांचा देखील पाठिंबा असतो, त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांचे क्रीडा क्षेत्रात करियर घडविण्यासाठी त्यांना पाठिंबा द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

दि एसएसके वर्ल्ड क्लब, पाथर्डी येथे जिल्ह्यातील अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते यशोकिर्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय,  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, दि एसएसके वर्ल्ड क्लबचे शैलेश कुटे, डॉ.जयश्री कुटे उपस्थित होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, नाशिकच्या खेळाडूंनी आपल्या खेळाने राज्याचे व देशाचे नाव उंचावले आहे. 1952 मध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले आहे. त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील कामगिरीतूनच यापुढेही नाशिकमधून आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये चांगल्या दर्जाचे रुग्णालय, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने बोटक्लब सारख्या विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच खेळाच्या दृष्टीने अभिमान वाटावा असे दि एसएसके वर्ल्ड क्लब आहे.

या क्लबमुळे खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळणे सोयीचं होणार आहे. नाशिकमधील कविता राऊत, दत्तु भोकनळ या सारख्या खेळांडूनी नाशिकचे नाव आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे. त्याचबरोबर पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळांडूची कामगिरीही कौतुकास्पद आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज्य शासनाने तालुका, जिल्हा व विभागास्तवरील क्रिडा संकुलांना निधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खेळाडूंच्या विकासासाठी शासनामार्फत आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री. भुजबळ सांगितले.

अर्जुन पुरस्कार  शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा यशोकिर्ती पुरस्काराने करण्यात आला सन्मान

अर्जुन पुरस्कार विजेते सत्कारर्थी

अर्जुन पुरस्कार विजेते आतंरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि रोईंगपटू दत्तू भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रिडा शिक्षक

अशोक दुधारे, नरेंद्र छाजेड, गोरखनाथ बलकवडे, आनंद खरे, अविनाश खैरनार

शिवछत्रपती पुरस्कार विजेते संघटक

सुनिल मोरे, साहेबराव पाटील, विजेंद्र सिंग, अंबादास तांबे, राजू शिंदे, शेखर भंडारी.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते

श्रद्धा वायदंडे, अविनाश खैरनार, शेखर भंडारी, संजय होळकर, सुषमा प्रधान, श्यामा सारंग, वैशाली फडतरे, सतीश धोंडगे, विष्णू निकम, राजेश गायकवाड, भक्ती कुलकर्णी, निलेश गुरुळे, अनुराधा डोणगांवकर, योगेश पटेल, श्रध्दा नालमवार, तुषार माळोदे, सुनिल मोरे, श्रेया गावंडे, लहानु जाधव, ज्ञानेश्वर निगळ, श्रृती वायदंडे, तनुजा पटेल, हंसराज

 

पाटील, वैशाली तांबे, शरयु पाटील, स्नेहल विधाते, अस्मिता दुधारे, किसन तडवी, सचिन गलांडे, संजीवनी जाधव, सायली पोहरे, विधीत गुजराथी, रोशनी मुर्तडक, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.हितेंद्र महाजन, भक्ती कुलकर्णी, संतोष कडाळे, मोनिका आथरे, अक्षय देशमुख, अक्षय अष्टपुत्रे, राजेंद्र सोनार, पुजा जाधव, सुलतान देशमुख, नसरत रफीउद्दीन, सुर्यभान घोलप, जागृती शहा.