शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणानंतर डीसीपींची उचलबांगडी

0
39

*👉👉कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांची मोठी कारवाई,*
*👉👉झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांची उचलबांगडी*

*मुंबई :-मुंबई पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर झालेल्या हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कुचकामी असल्याची पुष्टी झाली आहे.हा हल्ला म्हणजे मुंबई पोलिसांचे अपयश असल्याची टीका मोठ्या प्रमाणात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. कर्तव्य पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल कुमार यांच्यावर कारवाई झाली आहे. कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कारवाई केली आहे.*

*👉अजित पवारांनीच सवाल उपस्थित केले होते.*

*या हल्ल्याची पोलिसांना माहिती नव्हती का? पोलीस प्रशासन आणि इतर विभाग काय करत होता? या आंदोलकांचे एवढे धाडस झाले की पवारांच्या घरापर्यंत पोहोचले. मीडिया आधी पोहोचला पण पोलीस पोहोचले नाही, असे म्हणत अजित पवारांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणी सुरक्षेत चूक केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल, असा इशारा दुपारीच दिलीप वळसे-पाटील यांनी दिला होता.*

*👉संजय राऊत आणि फडणवीसांकडूनही सवाल*

*राज्याचा पोलीस विभाग हे प्रकरण वेळीच रोखण्यात अपयशी ठरला आहे. याचा शोध घेतला जाईल, मात्र पोलिसांचं अपयश आहे, एवढं नक्की आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली होती, तर देवेंद्र फडणवीसांनी हाच मुद्द पकडत अनेक सवाल उपस्थित केले होते. पोलीस प्रशासनाला या आंदोलनाची माहिती आधी कशी मिळाली नाही, असा सवाल फडणवीसांनीही केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून गृह विभागाच्या भूमिकेवरूनही अनेक सावल उपस्थित केली जात आहे, आता पुन्हा या प्रकरणानंतर गृह विभागाविषयी सवाल उपस्थित झाल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, डीसीपी डिटेक्शन निलोत्पल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.*

*👉सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी*

*एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.*

*👉काल, शुक्रवारी रात्री सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महेश वासनीस यांनी सदावर्तेंची बाजू मांडली. ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.*