गडचिरोली पोलिस दलातर्फे वीर बाबूराव कबड्डी स्पर्धा,पवनपुत्र क्रीडा मंडळ प्रथम

0
21

गडचिरोली,दि.11ः जिल्ह्यातील दुर्गम भागसतील युवकांच्या क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी पोलिस दलाच्या पोलिस दादालोरोला खिडकीच्या माध्यमातून ‘वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उपविभाग कुरखेडाच्या पवनपुत्र क्रिडा मंडळ विरसी संघाटने प्रथम क्रमांक पटकाविला. तर उपविभाग हेडरीच्या जय ठाकुरदेव क्रिडा मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धेला ८ एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये उपविभागीय स्तरावरील स्पर्धेतील वीर बजरंग कल्ब हलवेर (भामरागड), गोंडवाना कबड्डी संघ जिमलगट्टा, उडान कबड्डी क्लब संघ सिरोंचा, बाजीराव फिटनेस क्लब संघ कृष्णार (एटापल्ली), जय ठाकूरदेव क्लब परसलगोंदी (हेडरी), नवयुवक क्रिडा मंडळ कोरेली (बु.) अहेरी, पवनपूत्र क्रिडा मंडळ विरसी (कुरखेडा), जय बजरंग क्लब कारवाफा (पेंढरी) अशा १0 संघातील १२0 खेळाडुंनी सहभाग नोंदविला होती. या १0 संघामध्ये दोन दिवसांपासून पोलिस मुख्यालय मैदानावर राहमहर्षक लढती पार पडल्या. यामध्ये उपविभाग कुरखेड्याच्या पवनपूत्र क्रिडा मंडळ विरसी संघाटने प्रथम, उपविभाग हेडरीच्या जय ठाकूरदेव क्रिडा मंडळाने द्वितीय तर उपविभाग धानोराच्या एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही संघाने तृतीय क्रमांक पटाकविला.
प्रथम विजेत्या संघास २५ हजार रोख, ट्राफी, संघातील सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र, गोल्ड मेडल, द्वितीय विजेत्या संघास २0 हजार रोख, ट्राफी, संघातील सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र, सिल्व्हर मेडल, तृतीय क्रमांकाच्या संघास १५ हजार रोख, ट्राफी, सर्व खेळाडुंना प्रशस्तीपत्र व ब्रांझ मेडल तर उपविभाग भामरागडच्या वीर बजरंग क्लबल हलवेर संघास उत्तेजनार्थ बक्षीस ५ हजार रोख, सर्व खेळाडुंना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच उत्कृष्ट रिडर दीपक ठाकरे पवनपूत्र क्रिडा मंडळ विरसी, उत्कृष्ट ऑलराऊंडरर आशिष सोनवाणी एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही, उत्कृष्ट डिफेंडर सचिन आरमा जय ठाकूरदेव क्लब परसलगोंदी यांना यु-मुंबाची ट्राफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यासोबतच यु-मुंबाचे टीम लिडर संदीप सिंह व यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अभिषेक सिंह यांचा शाल श्रीफळ, मोमेटो, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास पोलिस अधीक्षक अंकीत गोलय, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, यु-मुंबाचे टीम लिडर संदीप सिंह, यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अभिषेक सिंह यांचे शहीद पांडू आलाम सभागृहात पार पडले.
स्पध्रेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रभारी अधिकारी पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, प्रोपागंडा व जनसंपर्क शाखेचे अधिकारी अशोक माने व अंमलदारांनी परिश्रम घेतले.