नव्या वाहतूक शाखा कार्यालयाचे लोकार्पण,तर उन्हामुळे दुपारच्या वेळी दोन तास सिग्नल बंद

0
36

गोंदिया,दि.11ः पोलीस विभागाच्या वाहतुक शाखेच्यावतीने शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी जयस्तंभ चौकात तयार करण्यात आलेल्या नव्या वाहतूक शाखा कार्यालयाचे लोकार्पण पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वाहतूक शाखा पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांच्यासह वाहतूक शाखेतील सर्व पोलीस कर्मचारी हजर होते.
त्यातच वाहतूकन विभागाद्वारे शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसें दिवस वाढत्या तापमानामुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहतूक शाखेच्या वरिष्ठांनी नागरिक व वरिष्ठ नागरीकांची मागणी लक्षात घेवून मुख्य मार्गांवरील सिग्नलच्या वेळेत बदल केला आहे. दुपारच्या वेळी हे सिग्नल दोन तासांसाठी बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र चौकांमध्ये झाडे, झुडपे तसेच कुठल्याही प्रकारचे शेड नसल्यामुळे वाहन चालकांना कडक उन्हात सिग्नल मिळेपयर्ंत उभे राहावे लागते. त्यामुळे त्या वाहकांचे खुपच हाल होत आहेत. यामुळे शहरातील सिग्नल दुपारी दोन तासांसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर दिवसें दिवस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.रत्यांवरुन वाहनांच्या रहदारीने अपघातांच्या वाढत्या संख्येने परिवहन विभागाद्वारे शहरातील मुख्य मार्गावरील चौकांवर सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर शहरातील वाहतुक व्यवस्था सुचारुपणे सुरु राहण्याकरिता विभागाद्वारे चौकांमध्ये पोलीस कर्मचांर्‍यांना तैनात केले आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन भरधाव वाहन चालविण्यांवर तसेच लापरवाही वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यात तसेच अपघातावर नियंण ठेवण्यास यश आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विभागाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न सफल होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु उन्हाचा हंगाम आल्याने विभागातील कर्मचार्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच चौकांमध्ये लावण्यात आलेल्या सिग्नलमुळे वाहन चालकांना त्रास होत आहे. तैनात असणार्‍या परिवहन विभागाच्या पोलीसांकडून वाहन चालकांच्या आरोग्याची चांगलीच दखल घेत आहेत. सिग्नल व्यवस्थेमुळे कडक उन्हापासून वाचविण्यासाठी सावली संबंधित पयार्यी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही.
चौकांमधील सिग्नलच्या वेळेप्रमाणे वाहन चालकांना हिरव्या सिग्नलची प्रतिक्षा करावी लागते.या दरम्यान वाहन चालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासंदर्भात शहरवासियांनी परिवहन विभागाला दुपारी सिग्नलचा वेळ प्रष्ठी ठेवण्याची मागणी केली आहे. त्याच प्रमाणे जिल्हा पोलीस अधिक्षक विश्‍व पानसरे यांच्या आदेशांतर्गत परिवहन विभागाद्वारे सिग्नल वेळेत फेरबदल कण्यात आले आहे. गत आठ दिवसांपासून चौकांमध्ये सिग्नल दुपारी १ ते ३ वाजेपयर्ंत बंद ठेवण्यात येत असल्याने वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच परिवहन विभागाच्या या कार्याचे कौतुकसुध्दा सर्वस्तरातून होत आहे.