रामनवमीनिमित्त शिक्षक संघातर्फे महाप्रसाद वितरण

0
17

गोंदिया,- रामनवमीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शहरातील नेहरू चौकात भाविकांना महाप्रसादचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यासह शहरात रविवारी मोठ्या उत्साहात रामनवमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शहरातील उत्सव समितीच्या वतीने रविवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरासह परिसरातील भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. शोभायात्रेत सहभागी भाविकांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नेहरू चौकात महाप्रसाद वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कटरे, अनिरुद्ध मेश्राम, नुतन बांगरे, यशोधरा सोनवाने, यशवंती लिखार, यु. पी. पारधी, सुधीर वाजपेयी, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे, विनोद लिच़डे, शंकर चव्हाण, योगेश्वर मुंगुलमारे, पवन कोहळे, ओमेश्वर बिसेन, वाय. डी. पटले, चंद्रशेखर दमाहे, गणेश चुटे, प्रवीण नरूले, एम. डी. फड, सुनील सोनवाने, मोरेश्वर बडवाईक, नितू डहाट, श्रीमती पटले, पल्लवी नंदनवार, श्रीमती ठाकरे, एम. आर. पारधी, सुरेश रहांगडाले, सोनकल्याणी, लोकेश कटरे, गणेश सानप, विजय लिल्हारे, राजू निंबार्ते, मुनेश्वर जैतवार आदी उपस्थित होते.

रामनवमीनिमित्त आईसक्रिम वितरण
गोंदिया- रामनवमीचे औचित्य साधून श्री राम युवक मंडळाच्यावतीने येथील पाल चौकात रविवारी भाविकांना आईसक्रिम वितरण करण्यात आले.जिल्ह्यासह शहरात रविवारी मोठ्या उत्साहात रामनवमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शहरातील उत्सव समितीच्यावतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरासह परिसरातील भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. शोभायात्रेत सहभागी भाविकांना श्री राम युवक मंडळाच्यावतीने आईसक्रिम वितरित करण्यात आले. यावेळी रोहीत कावळे, संतोष उके, प्रशांत शेंडे, गौरव चन्नेकर, राहुल गौतम, रवी गौतम, मोहीत गढरिये, सुधीर, आशिष रहांगडाले, आशिष लिल्हारे, बिट्टू गौतम, अभय बादलवार, सौरभ कावळे आदी उपस्थित होते.